Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रअवकाळी पावसाचे राज्यात पाच बळी

अवकाळी पावसाचे राज्यात पाच बळी

पुणे | Pune

महाराष्ट्रात दि. 20 मार्चपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मराठवाड्यात अवकाळी पावसाचे पाच बळी गेले आहेत….

- Advertisement -

आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अवकाळी पावसाने हजारो हेक्टरवरील पिके भूईसपाट झाले आहेत. नुकसानीची माहिती मोबाईलवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परभणीत अवकाळी पावसाचे 5 बळी गेले आहेत. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव हटकर शिवारात वीज पडून ओंकार शिंदे या 15 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे, यात त्याची आई गंभीर भाजली आहे.

गुरुवारी सोनपेठ तालुक्यातील उखळी बुद्रुक येथील नीता सावंत यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. तर गंगाखेड तालुक्यातील उखळी खुर्द येथे शेतात काम करीत असतांना 5 जणांच्या अंगावर वीज कोसळली, यात दोघांचा मृत्यू झालाय तर इतर तिघे जण जखमी असल्याची मिळत आहे.

Know Your Army : सारे जहाँ से अच्छा…; गोल्फ क्लबवर तोफांसह शस्त्रसाठा दाखल; ‘पाहा’ खास Photos

दरम्यान, नाशिक जिल्ह्यात गारपीट सुरूच आहे. नाशिकच्या कळवण, दिंडोरीमध्ये वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यात उन्हाळी कांदा, काढणीला आलेला गहू आणि हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

लॉन्ग मार्चमध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

नाशिकच्या चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाचा पुन्हा एकदा फटका बसला. चांदवडच्या पूर्व भागातील पन्हाळे गावात सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या