Saturday, May 4, 2024
Homeनाशिकरामकुंडावर विधीसाठी पाचच लोकांना प्रवेश !

रामकुंडावर विधीसाठी पाचच लोकांना प्रवेश !

पंचवटी | Panchavti

रामकुंड येथे धार्मिक विधीसाठी फक्त पाच पेक्षा अधिक नागरिकांनी येऊ नये आणि पूजा करताना सामायिक अंतर ठेवून बसावे असे पुरोहित संघाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आल्याने यापुढे धार्मिक विधीसाठी पाचच नागरिकांना गंगाघाट परिसरात प्रवेश दिला जाणार असून यासाठी विविध ठिकाणी जनजागृतीचे फलक देखील लावण्यात आले आहे .

- Advertisement -

शनिवार रविवार विकेंड लॉकडाऊन लक्षात घेता पोलिसांनी गंगाघाट परिसराकडे येणाऱ्या रस्ते बॅरिकेडस लावून बंद केले होते. तसेच दिवसभर रामकुंड परिसरात पोलिसांची गस्त सुरू होती.

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता आणि होणाऱ्या गर्दीमुळे महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद करण्यात आली असून अनेक ठिकाणच्या जत्रा आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे .

तसेच, लग्न संमारंभासाठी पन्नास आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी वीसच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी होण्याचे प्रमाण काही अर्थाने कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र,दुसरीकडे रामकुंड येथे आपल्या आप्त स्वकीयांच्या अस्थी घेऊन अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे चित्र दररोज बघायला मिळत होते.

यासाठी पुरोहित संघाने चर्चा करून दशक्रिया विधीसाठी पाच लोकांपेक्षा अधिक नागरिकांना येण्यास मज्जाव केला आहे. त्यासाठी जनजाग्रुती करण्यासाठी रामकुंडासह गंगाघाट परिसरात ठिकठिकाणी फलक देखील लावण्यात आले असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर शनिवारी रामकुंड पोलीस चौकी समोरील परिसर, दुतोंडया मारुती जेथून रामकुंडात जाण्यासाठी मार्ग आहे अश्या मार्गावर बॅरेकेट्स लावण्यात आले होते.

केवळ धार्मिक विधीसाठी येणाऱ्या मर्यादित नागरिकांना प्रवेश करण्यात आला होता. पोलिसांच्या वतीने नियमांचे पालन करण्याबाबत लाऊडस्पीकरवर आवाहन केले जात होते.

दशक्रिया विधीसाठी होणारी गर्दी आणि त्यात शनिवार रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्याचे आदेश असल्याने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी रामकुंड आणि गंगाघाट परिसरात येणाऱ्या सर्व रस्ते बॅरिकेडस लावून बंद केले असून विधीसाठी नागरिकांनी पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये आणि पुरोहितांनी देखील दोन पूजांमध्ये सामायिक अंतर ठेवून शासन नियमांचे पालन करण्याच्या सूचना दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दिल्या आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या