Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी ! बारावी पेपर फुटीप्रकरणी दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

मोठी बातमी ! बारावी पेपर फुटीप्रकरणी दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

बुलढाणा | Buldhana

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (Maharashtra State Boards of Secondary and Higher Secondary Education) बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत…

- Advertisement -

या परीक्षा पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित व्हाव्यात यासाठी बोर्डाने कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले आहे. मात्र, बोर्डाच्या या परीक्षेच्या पारदर्शकतेला काही अप्रिय घटनांनी गालबोट लागले आहे.

इंग्रजी (English) विषयाच्या पहिल्याच प्रश्नपत्रिकेत चक्क उत्तर छापून आल्यानंतर राज्यभरात याची चर्चा झाली होती. त्यानंतर बीड येथील एका परीक्षा केंद्रात पेपर देण्यासाठी आलेल्या मराठी माध्यमाच्या (Marathi medium) विद्यार्थ्यांना चक्क इंग्रजीमधून प्रश्नपत्रिका मिळाली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला.

अशा घटना घडल्या असताना काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील एका परीक्षा केंद्रावर (Examination Centre) तर चक्क गणिताचा पेपर (Mathematics paper) फुटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

जाळीवरून उडी मारून बिबट्याने शेळी केली ठार

हे पेपर फुटीचे प्रकरण विधिमंडळाच्या (Legislature) अधिवेशनातही गाजले होते, त्यामुळे शिक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासन यांच्यासमोर दोषींवर कारवाई करण्याचे मोठे आव्हान होते. यासंदर्भातच आज मोठी बातमी समोर आली आहे. बुलढाणा येथील पेपर फुटीप्रकारणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

Video : कांदाप्रश्नी केंद्रीय मंत्र्यांना शेतकऱ्यांचा घेराव; डॉ. भारती पवार म्हणाल्या…

या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून यात दोन शिक्षकांचा देखील समावेश आहे. पेपर सुरु होण्याचा अर्धा तासापूर्वी गणिताचा पेपर सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला होता. यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणात दोन शिक्षकांसह आजुबाजुच्या गावातल्या तीन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

त्यांच्यावर भारतीय दंड विधानातील (Indian Penal Code) कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही  सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याबरोबरच पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण ? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे.  दरम्यान  या प्रकरणाचे धागेदोरे दूरपर्यंत पोहचले असल्याचे बोलले जात असल्याने मुख्य सूत्रधार समोर येणे आवश्यक आहे असा सूर जनतेमधून निघत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या