Sunday, November 3, 2024
Homeमहाराष्ट्रAccident News : कार पुलावरुन थेट रेल्वे रुळावर कोसळल्याने भीषण अपघात; ५...

Accident News : कार पुलावरुन थेट रेल्वे रुळावर कोसळल्याने भीषण अपघात; ५ गंभीर जखमी

वर्धा | Wardha

शुक्रवारी (दि.३० जून) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana District) पिंपळखुटा गावाजवळ एका खाजगी प्रवासी बसला आग (Fire) लागल्याची घटना घडली. यामध्ये २५ जणांचा होरपळून मृत्यू (Death) झाला.

- Advertisement -

एसीबीच्या कारवाईत तांत्रिक अडचणी; चर्चांना उधाण

तर ८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. अशातच आता वर्धा नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील बोरखेडी शिवारात ( Borkhedi Shiwar) कार थेट पुलावरून खाली कोसळल्याने भीषण अपघात (Terrible Accident) झाल्याची घटना घडली आहे…

जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी बॅंक निवडणूक : मतदानासाठी सभासदांची गर्दी

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जाम नागपूर मार्गावरील बोरखेडी शिवारातील पुलावरून कार कोसळून (Car Crashed) थेट रेल्वे रुळावर जाऊन पडली. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात असून या अपघातात ५ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अपघातात जखमी झालेले व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे समजते असून हे सर्वजण हैद्राबाद येथून नागपूरच्या दिशेने जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Buldhana Bus Accident : २४ तास उलटूनही ओळख पटेना, मृतांवर आज होणार सामूहिक अंत्यसंस्कार… कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर जिल्ह्याच्या (Nagpur District) बुट्टीबोरी येथील एका रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच हा अपघात इतका भीषण होता की, कार पुलावरुन थेट खाली कोसळल्याने कारचा पूर्णता चक्काचूर झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या