Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यानोटबंदीला पाच वर्षे पूर्ण; विरोधकांनी साधला मोदी सरकारवर निशाणा

नोटबंदीला पाच वर्षे पूर्ण; विरोधकांनी साधला मोदी सरकारवर निशाणा

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी भारतीय चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली होती. त्याला आज ५ वर्षे पूर्ण झाली (Five years after demonetisation). यानिमित्ताने मोदी सरकारवर (Modi govt) टीका करण्याची संधी विरोधकांनी साधली आहे.

- Advertisement -

काँग्रेस (congress) नेत्या प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एक ट्विट करून सवाल विचारले आहेत. नोटबंदी यशस्वी झाली आहे, तर काळा पैसा परत आला का??, भ्रष्टाचार संपला का??, दहशतवादावर प्रहार झाला का??, गरिबी हटली का?? आणि महागाई कमी झाली का?!, असे एका पाठोपाठ एक सवालांचे बाण प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर सोडले आहेत.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले, ‘आज नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण झाली. ज्या दिवशी नोटबंदी करण्यात आली, त्या दिवशी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की आज रात्री १२ वाजल्यापासून ५०० आणि १००० च्या नोटा चालणार नाहीत. नोटबंदीमुळे देशात संपूर्ण हाहा:कार माजला. काळं धन संपेल, देशातून भ्रष्टाचार संपून जाईल, आतंकवाद या देशातून हद्दपार होऊन जाईल असं सांगितलं होतं. पण पाच वर्षात ना काळं धन कमी झालं, ना भ्रष्टाचार, ना आतंकवाद. नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

तसेच ‘नोटा बदलण्यासाठी रांगेत राहिलेल्या अनेकांचा मृत्यू झाला. मोदींनी सांगितलं होतं की मला तीन महिन्यांचा अवधी द्या. पाच वर्षात ना काळं धन कमी झालं, ना भ्रष्टाचार, ना आतंकवाद. नोटबंदीच्या निर्णयामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. आज नोटबंदीला पाच वर्ष पूर्ण झाली, मोदी तुम्ही सांगितलं होतं की चौकात मला शिक्षा द्या. चौक कोणात आहे तो सांगा आणि देशाची जनता आपल्याला विचारतेय की कोणती शिक्षा द्यायची, असा टोला नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.

त्याचबरोबर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. नोटबंदी बद्दल केंद्र सरकारनं संपूर्ण देशाची माफी मागायला हवी, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या