Tuesday, June 25, 2024
Homeमुख्य बातम्याNew Parliament : नव्या संसद भवनावर फडकला तिरंगा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या...

New Parliament : नव्या संसद भवनावर फडकला तिरंगा; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ध्वजारोहण

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

संसदेचे विशेष अधिवेशन (Special Session of Parliament) सुरू होण्याच्या एक दिवस आधी आज (दि.१७ सप्टेंबर) नवीन संसद भवनावर भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकवण्यात आला आहे. देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) यांच्या हस्ते ध्वजारोहण (Flag Hoisting) करण्यात आले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी हे देखील उपस्थित होते.

सोमवार (दि.१८ सप्टेंबर) रोजी संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. पहिल्या दिवसाचे अधिवेशन संसदेच्या जुन्या इमातीतून होईल. त्यानंतर उरलेल्या चार दिवसांचे अधिवेशन संसदेच्या नवीन इमारतून होईल, असे सांगण्यात आले. त्यापूर्वी औपचारिकरीत्या आज नव्या संसद भवनावर (New Parliament Building) ध्वजारोहण करण्यात आले.

Nashik News : ड्रायपोर्ट विकसित करण्यासाठी ‘इतके’ कोटी रुपये जमा

या सोहळ्यास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) उपस्थित नव्हते. आधीच ठरलेल्या आपल्या पूर्वनियोजित काँग्रेस (Congress) कार्यकारिणीच्या बैठकीत व्यस्त असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच सरकारने त्यांना या कार्यक्रमाचे उशिराने निमंत्रण पाठवले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे त्यांना या सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही.

दरम्यान, यावेळी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन, पीयूष गोयल, अर्जुन राम मेघवाल, काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी आणि प्रमोद तिवारी यांच्यासह दोन्ही सभागृहातील पक्षांचे नेते नवीन संसद भवनात ध्वजारोहणाप्रसंगी उपस्थित होते.

‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी शर्मा

नवा ड्रेस कोड

नव्या संसद भवनात शिफ्ट होण्यासाठी सरकारने तयारी सुरु केली आहे. ध्वजारोहण झाल्याने आता अधिकृतरीत्या नव्या संसद भवनात शिफ्ट होता येणार आहे. विशेष म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहात नवा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे संसदेतील कर्मचाऱ्यांना नवा गणवेश परिधान करावा लागणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या