Thursday, June 18, 2026
HomeनगरShirdi : ध्वजारोहण करत शिर्डी परिक्रमेच्या तयारीस उत्साहात प्रारंभ

Shirdi : ध्वजारोहण करत शिर्डी परिक्रमेच्या तयारीस उत्साहात प्रारंभ

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईनगरीत मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर शिर्डी परिक्रमा ध्वजारोहण सोहळा 2026 अत्यंत मंगलमय आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला.साई नामाचा जयघोष करत टाळ-मृदंगाचा नाद आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा साईबाबा मंदिराच्या गेट नं. 4 जवळ संपन्न झाला.

- Advertisement -

या सोहळ्याची सुरुवात परंपरेनुसार ध्वज मिरवणुकीने झाली. साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन साईबाबांना विधिवत आमंत्रण देण्यात आले. यावेळी ध्वजाचा स्पर्श श्रींच्या समाधीला करून आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर ही ध्वज मिरवणूक गुरुस्थान, गणेश मंदिर, शनी व महादेव मंदिर, दत्त मंदिर आणि नंदादीप मार्गे मार्गस्थ झाली. साईभक्तीने ओसंडून वाहणार्‍या या मिरवणुकीने द्वारकामाई आणि चावडी येथे दर्शन घेतले. त्यानंतर गावातील इतर ग्रामदैवत मंदिरांचे दर्शन घेत ही मिरवणूक खंडोबा मंदिरात पोहोचली. संपूर्ण मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या आणि फुलांच्या वर्षावाने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.

खंडोबा मंदिरातून वाजत-गाजत ही मिरवणूक मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी, मंदिर गेट नं. 4 जवळ आली. येथे ध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि नगराध्यक्षा जयश्री थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वज आकाशात झेपावताच उपस्थितांनी एकच जयघोष केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

ताज्या बातम्या

Shivsena UBT Crisis : संजय जाधव फुटीर खासदारांचे ‘बॉस’; परभणीत दाखल...

0
मुंबई | Mumbai राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ यश आले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या...