जळगाव jalgaon। प्रतिनिधी
देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 74th Independence Day जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील Guardian Minister no. Gulabrao Patil यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी सकाळी 9 वाजता ध्वजारोहन होणार आहे.
या कार्यक्रमास जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, वीरपिता तसेच कोरोनायोध्दा डॉक्टर, सफाई कामगार, आरोग्य सेवक यांनी उपस्थित राहावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी मास्क परिधान करणे व सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.
तसेच सकाळी 8.30 ते 9.35 वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेच्यानंतर आयोजित करावा. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.