Friday, June 21, 2024
Homeनाशिककाँग्रेस स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन

काँग्रेस स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

- Advertisement -

काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. या निमित्ताने नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीमध्ये सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले. शहर अध्यक्ष शरद आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण केले करण्यात आले.

अध्यक्ष शरद आहेर यांनी सांगितले की, या देशात सुई ते मिसाईल असा देशाचा प्रवास काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झाला आहे.

याप्रसंगी प्रसंगी माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, प्रदेश सचिव शाहू खैरे, प्रदेश सरचिटणीस राहुल दिवे, महिला अध्यक्ष वत्सला खैरे, प्रदेश सचिव सुरेश मारू, निलेश खैरे, काँग्रेस आदिवासी सेल संतोष ठाकूर, कैलास कडलग, ज्ञानेश्वर चव्हाण, धोंडीराम बोडके, रमेश पवार, रमेश जाधव, लक्ष्मण धोत्रे, सिराज भाई जिनी, आकाश घोलप, वंदना पाटील, राजेंद्र महाले, भगवान आहेर, मनीष राठोड, बाळा कदम ,शांताराम दुसाने आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या