अस्तगाव (वार्ताहर)
जेष्ट चित्रपट अभिनेते देव आनंद दिग्दर्शित आणि अभिनय असलेला प्रेमपुजारी चित्रपटाला रिलीज होवुन 28 जानेवारी रोजी 50 वर्ष पुर्ण झाले. राहता तालुक्यातील अस्तगाव येथे या चित्रपटाचे चित्रकरण झाले होते. अस्तगाव परिसरात आणि संपुर्ण जिल्हा भरातुन चाहते चित्रपटाचे चित्रकरण पाहाण्यासाठी होते. 28 जानेवारी 1970 ला चित्रपट प्रदर्शित झाला होता.
अस्तगावचा आणि देवआनंद यांचा 1965 ते 1970 च्या दरम्यान दोन वेळेस संबंध आला. 1965 मध्ये तीन देवियाँ चे गाणे अस्तगाव परिसरात चित्रीत करण्यात आले. असे सांगितले जाते की, देवानंद टिम सह शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनास आले होते. त्यांना राहाता साखर कारखाना (आत्ताचा गणेश कारखाना) बघण्याची इच्छा झाली. ते गोदावरी कालव्याने जात असताने त्यांना अस्तगाव परिसर शुटींग साठी योग्य वाटले. प्रथम त्यांनी तीन देवीया साठी एका गाण्याचे चित्रीकरण 1965 मध्ये बेबीनंदा व स्वता देवआनंद यांचेवर चित्रीत करण्यात आले. बाजरीचे शेत त्यांनी यासाठी लोंढे मळ्याच्या पुर्वेला असलेल्या शेतात त्याचे चित्रीकरण केले.
त्यावेळी त्यांचा गावातील अनेकांशी संबंध आला. गावातील मुलानी बाबा यांचा घोडा त्यांनी चित्रीकरणासाठी वापरला होता. या गाण्यानंतर देवआनंद व अस्तगाव ग्रामस्थ यांचे संबंध वाढु लागल्याने पुढे नवकेतन फिल्म च्या प्रेम पुजारी साठी त्यांनी अस्तगाव ची पुन्हा निवड केली. गावातील दिवंगत प्रसिध्द फुलशेती तज्ञ विलास डुंगरवाल यांचे मळ्यात फुलपाखरे पकडण्याचे चित्रीकरण, रामभाऊ जेजुरकर यांचे ऊसाच्या शेतात पाक सैनिकांबरोबर चकमकीचा क्षण, तसेच गावातील पदुबाईचा पार म्हणुन प्रसिध्द असलेल्या पारावर राममंदिरा शेजारी त्यांची चित्रीकरण केले.
प्रेम पुजारी चित्रपटात पंजाब मधील खेमकरण गाव त्यांनी दाखविले. पदुबाईच्या पारावर चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण केलेले प्रसिध्द चित्रपट अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे पाकिस्तानी सेनेचे अधिकारी दाखविले. पदुबाईच्या पारावर देवाआनंद हे गोळ्या घालतात. शेजारील राममंदिर व चिंच अजुनही या चित्रपटाची आठवण करुन देत आहे.
शोकियोंमे घोला जाए, फुलोंका शबाब, उसमे फिर मिलाए जाए थोडीशी शराब. होगा यु नशा जो तैयार ,ओ प्यार हे गाण्यातील काहि भाग डुंगरवाल यांचे मळ्यात चित्रीत करण्यात आला आहे. तर दुंगी तेनु रेश्मी रुमाल, बाके जरा देरे आना या पंजाबी ढंगाचे गित साहेबराव गणपत गाडेकर यांचे शेतात चित्रीत करण्यात आले. हे गाणे अभिनेत्री वहिदा रहेमान यांचेवर चित्रीत करण्यात आले. या चित्रीकरणाच्या वेळी देवानंद, शत्रुघ्न सिन्हा, वहिदा रहेमान, सचिन, मुक्री अदि त्यावेळचे प्रेम पुजारीच्या टिम मधील अभिनेते, अभिनेत्री यांनी हजेरी लावली.
प्रेम पुजारीच्या चित्रीकरणाच्या वेळी त्यांचा मुक्काम राहाता येथील पाटबंधारे खात्याच्या विश्राम गृहावर होता. अस्तगावला त्यावेळी प्रसिध्दीस आणण्यात देवआनंद याचा मोठा वाटा आहे. अस्तगाव ला चित्रीपटाचे शुटींग चालु आहे. असे समजल्यानंतर जिल्ह्यातुन अनेक जणांनी अस्तगावला त्यावेळी धाव घेतली होती. गोरा गोमटा, लालबुंद हिरो असे त्यावेळी देवआनंद यांना प्रत्यक्ष बघितलेल्यांनी आज ही आठवणींना उजाळा देतात.
या चित्रपटात सुरुवातीलाच अस्तगाव ग्रामस्थांचे आभार मानले आहेत. अस्तगावच्या मुलानी बाबांना त्यांनी एका गाण्याच्या चित्रीकरणातही घेतलेले आहे.
चित्रीकरणाच्या वेळेच्या देवानंद च्या आठवणी आज ही त्यावेळचे तरुण व आताच्या वयस्कर अजुनही सांगतात. आता कुठेही चित्रीकरण होते. परंतु त्यावेळी विशेष मानले जात होते. अस्तगावला प्रेम पुजारीच्या माध्यमातुन पडद्यावर आणले. त्यामुळे त्यांच्या बद्दल ग्रामस्थांना अभिमान आहे.
पदुबाईचा पार आजही तसाच आहे. त्यावरील जुनाट झालेले झाड मात्र कधीच पडले आहे. त्याजागी नविन झाड लावण्यात आले आहे. त्यासोबत असलेले पदुबाईचे लहानसे मंदिर अजुनही त्याच अवस्थेत आहे. या मंदीराकडे बघीतले की, देवाआनंद यांची आठवण येते. शेजारील राममंदिर तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचार्यांचे निवास अजुनही तसेच आहे. शेजारील चिंच आज ही आहे. तीचा आकार वाढला आहे. आज ही चिंच उभी आहे.