Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजनदोन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फ्लइट

दोन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फ्लइट

एअर फोर्स वन-१ हा हॉलीवूडमधील चित्रपट. एका विमानात झालेले सर्व चित्रीकरण. अमेरिकेचे सर्वेसर्वा म्हणजेच राष्ट्रध्यक्षाचे अपहरण करण्याचा कट त्यात शिजतो. मग दोन-अडीच तासाचा हा संपुर्ण चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. त्या चित्रपटाची आठवण फ्लाइट या चित्रपटामुळे आली.

बॉलीवूड कलाकार मोहित चड्डा यांची प्रमुख भूमिका असलेला फ्लाइट आजपासून रिलिज झाला. चित्रपटाच्या बहुतांश भागाचे चित्रीकरण विमानात झाले आहे. उत्कृष्ट सादरीकरणामुळे चित्रपट अधिक रंजक झाला आहे. चित्रपटाचा नायक असलेला मोहीत चढ्ढा म्हणजेच रणवीर मल्होत्रा एका मोठ्या विमान कंपनीचा एमडी असतो. त्यांच्या कंपनीने बनवलेल्या विमानाचा अपघात होते. त्यात अनेक प्रवाश्यांचे प्राण जाते. मग अपघातास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा छडा लावण्याचा निर्णय रणवीर घेतो. स्वत:च्या खाजगी जेट विमानाने तो जात असताना त्या विमानाचे अपहरण होते. विमानातील कोपायलेट व इतर स्क्रू मेबंरचा खून केला जातो. रणवीर ड्रिक्समधून गुंगीचे औषध दिले गेले असते. परंतु जेव्हा रणवीरला जाग येते तेव्हा विमानातील परिस्थिती समजायला लागते. कोणताही सहकारी वाचलेला नसतो. विमानात रणवीर शिवाय कोणी नसते. ते ऍटो मोडवर उडत असते. रुटवरुन गायब झाल्यामुळे कोणतेही रडार त्याला कॅच करत नाही. मग या परिस्थितीचा रणवीर सामना कसा करतो? त्याला मारण्याचा कट रचणाऱ्यांना तो धडा शिकवतो का? या प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहण्यातून मिळणार आहे.

- Advertisement -

चित्रपट नायक केंद्रीत आहे. त्यात दोन मिनिटांसाठी रणवीरची गर्लफ्रेंड दाखवली आहे. चित्रपटात एकही गाणे नाही. त्यानंतर संपुर्ण चित्रपट हॉलीवूड चित्रपटासारखा खिळवून ठेवतो. कुठेही थ्रिल कमी होत नाही. चित्रपटाच्या शेवटही सस्पेन्स ठेवलेला आहे. त्याचा पुढील भागात हे सस्पेन्स उघडणार आहे. नायक म्हणून मोहित चढ्ढाने आपल्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. चित्रपटाचे निर्देशन सूरज जोशी यांनी केले आहे. कथा, पटकथा, दिग्दर्शन या सर्व पातळीवर चित्रपट पाहण्यासारखा आहे. वेगळ्या विषयाच्या हाताळणीमुळे प्रेमाच्या त्रिकोणातून बॉलीवूडमध्ये वेगळा विषय चांगल्या पद्धतीने हाताळला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Anjali Damania : “धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंविरोधात…”; अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट

0
मुंबई | Mumbai सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आज पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट...