Friday, June 14, 2024
Homeनगरउड्डाणपुलाचे भूमिपूजन पुढील महिन्यात - खा. विखे

उड्डाणपुलाचे भूमिपूजन पुढील महिन्यात – खा. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

शहरातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या 15 ते 30 फेब्रुवारी दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना नगरला आणून त्यांच्या हस्ते

उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, लष्कराच्या के. के रेंज या सराव क्षेत्राच्या भूसंपादनाच्या मुद्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेणार असल्याचे खा. डॉ. विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.के. के रेंज लष्करी सरावासाठी 23 गावांच्या जमिनींचे भूसंपादन लष्कराकडून होणार नाही, पण जमीन वापर होणार आहे.

त्यामुळे या वापराचा मोबदला मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्यांनी ती नामंजूर केली आहे. त्यामुळे या मुद्यावर न्यायालयात जाता येऊ शकते व याच मुद्यावर मार्गदर्शन घेण्यासाठी पवारांची भेट आपण दिल्ली अधिवेशनाच्या काळात घेणार आहोत, असे खा. डॉ. विखे यांनी सांगितले. के.के. रेंज भूसंपादनावरून मध्यंतरी शेतकर्‍यांपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अफवा पसरवल्या गेल्या व त्यात मूळ प्रश्न मागे राहिला.

राजकारण त्यात आले. त्यामुळे श्रेयवादात न पडता पवारांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत असेल तर आपण तसे करू, पण या विषयाला पक्षीय रंग देणे योग्य नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या