Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याद्वारकाचौक ते दत्तमंदिर दरम्यान उड्डाणपूल

द्वारकाचौक ते दत्तमंदिर दरम्यान उड्डाणपूल

देवळाली कॅम्प । वार्ताहर

द्वारका चौकातील Dwarka Chowk वाहतुकीची कोंडी सुटावी, अपघातांना आळा बसावा तसेच भविष्यात या रस्त्यावर वाहतूक सुरळीत रहावी याकामी या सहा किलोमीटर रस्त्यावर उड्डाणपुल होणेकामी सदर रस्ता राष्ट्रीय महामार्गात समावेश करावा, अशी शिफारस प्राधिकरणाने रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे केली असल्याची माहिती खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )यांनी दिली.

- Advertisement -

शहराच्या मध्यवस्तीत द्वारका चौक असून या चौकात मुंबई-आग्रा व नाशिक-पुणे या दोन महामार्गांचा संगम आहे. द्वारका येथून पुणेकडे जाणार्‍या महामार्गावरुन नाशिकरोड, सिन्नर, शिर्डीकडे मोठ्या प्रमाणावर वाहने जातात. शहरातील सर्वात दाट वाहतुकीचा हा रस्ता आहे. परिणामी द्वारका चौक ते दत्तमंदिर सिग्नल ( dwarka chowk to dattamandir signal ) या दरम्यान वाहतुकीची सतत कोंडी होते.

द्वारका चौकासह बोधलेनगर, गांधीनगर, उपनगर, नेहरुनगर परिसरातील वाहतुक कोंडी कायमची सुटावी, यासाठी खा. गोडसे यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत हा प्रश्न किती गंभीर आहे, याचे महत्त्व पटवून दिले होते. दीड वर्षापूर्वी नितीन गडकरी यांनी प्रस्तावित उड्डाणपुलाला तत्त्वता मान्यता देवून सुमारे पाचशे कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यानच्या काळात द्वारका-दत्तमंदिर उड्डाणपुलाच्या कामाचा सविस्तर अहवाल देखील तयार करण्यात आला होता.

मात्र सदर रस्ता हा महानगरपालिका हद्दीत येत असल्याने कामासाठी निधी कोण देणार हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला. कारण मनपाचे आर्थिक बजेट कमी असल्याने या कामासाठी निधी मिळणे शक्य नव्हते.शिवाय हद्दीच्या प्रश्न मुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील हात वर केले होते.

यातून मार्ग काढण्यासाठी खा. गोडसे यांनी पुन्हा दिल्ली दरबारी प्रयत्न सुरु करीत सहा किलोमीटरचा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्गिकरण करुन निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली. प्राधिकरणाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत द्वारका ते दत्तमंदिर रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्गीकरण करण्याची शिफारस रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडे केली आहे.

नागपूर शहरात रस्त्यावर उड्डाणपुल आणि त्यावर मेट्रो कार्यरत आहे. याच धर्तीवर द्वारका ते दत्तमंदिर दरम्यान उड्डाणपुल व मेट्रोची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी मेट्रो प्रशासन आणि नॅशनल हायवे, यांनी एकत्रितपणे नियोजन करावे.

खा. हेमंत गोडसे MP Hemant Godse

- Advertisment -

ताज्या बातम्या