Friday, March 28, 2025
HomeनगरAMC : उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावून विद्रुपीकरण

AMC : उड्डाणपुलाच्या पिलरवर पोस्टर लावून विद्रुपीकरण

महानगरपालिकेची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील त्यांच्या जीवनातील प्रसंगचित्रे रेखाटण्यात आली आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेकडून जाहिराती, फलक लावण्यास परवानगी दिली जात नाही, हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही, या पिलरवर विनापरवाना जाहिरातबाजी करून त्याचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. या प्रकरणी महानगरपालिकेने कठोर कारवाई करत जाहिरातबाजी करणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मार्केटयार्ड चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरवर जाहिरात पोस्टर लावल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांना मिळाली होती. त्यांनी प्रभाग अधिकारी राकेश कोतकर यांना आदेश देत तत्काळ तपासणी करून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. प्रभाग अधिकार्‍यांनी पाहणी केली असता राजलक्ष्मी वास्तू डेव्हलपर्स निर्मीत श्रीकृष्ण पार्क, शिक्रापूर येथे रोडटच प्लॉटस अशा आशयाचे जाहिरातीचे पोस्टर लावून विद्रुपीकरण केल्याचे समोर आले. सदरचे स्किमचे मालक विशाल गवारे (रा. खराडी बायपास बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर, तिसरा मजला, पुणे) हे आहेत. महानगरपालिका अधिकार्‍यांनी पंचनामा करून विशाल गवारे याच्या विरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शहरात विनापरवाना पोस्टर व फलक लावण्यात आल्याबाबत तत्काळ तपासणी करावी. विनापरवाना फलक, पोस्टर आढळल्यास तत्काळ संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश आयुक्त डांगे यांनी सर्व प्रभाग समिती अधिकार्‍यांना दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांकडून दुय्यम निबंधकाने घेतली पाच हजारांची लाच

0
अहिल्यानगर/श्रीगोंदा |प्रतिनिधी| Ahilyanagar| Shrigonda आजच्या दस्ताचे सकाळी तुमच्याशी बोलणे झाले आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या, असे म्हणत श्रीगोंदा येथील एका वकिलांकडून दस्त नोंदवण्यासाठी दुय्यम निबंधकाने...