Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमअन्न प्रशासन विभागाचे आठ दूध विक्री केंद्रांवर छापे

अन्न प्रशासन विभागाचे आठ दूध विक्री केंद्रांवर छापे

दुधाचे 19 सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न प्रशासनातर्फे राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत येथील अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी अहिल्यानगर शहरातील दुध विक्री करणार्‍या आठ डेअरींवर छापेमारी केली. कारवाईत दुधाचे 19 सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. या नमुन्यांची तपासणी केली जाणार असून, यात भेसळ आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

- Advertisement -

राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरात दुधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविली गेली. येथील अन्न प्रशासनाच्या दोन निरीक्षकांनी अहिल्यानगर शहरासह सावेडी भागातील आठ डेअरीवर छापे टाकून पाऊचमधून व सुट्या स्वरूपातील दुधाचे नमुने घेतले. यामध्ये गाय व म्हैस यांच्या दुधाचे मिळून 19 नमुने घेण्यात आले आहेत. ते नाशिक येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तपासणीअंती त्यामध्ये भेसळ आढळून आल्यास संबंधित डेअरी मालकांविरूध्द कारवाई केली जाणार असल्याचे येथील अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

अहिल्यानगर शहरातील विशाल गणपती मंदिराजवळील गणेश घी डेपो, चर्च रस्त्यावरील कैलास डेअरी, सबजेल चौकातील राहुल डेअरी, डावरे गल्लीतील साई डेअरी, गुलमोहोर रस्त्यावरील सात्विक डेअरी, सावेडी उपनगरातील नायरा पेट्रोप पंपा जवळील समर्थ व त्रिमूर्ती डेअरी, गुलमोहर रस्त्यावरील कबीर केक बेकरी या ठिकाणांहून दुधाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तेथील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

संकलन केंद्र वगळली
राज्यभर अन्न प्रशासन विभागाने राबविलेल्या मोहिमेत दुध विक्रेत्यांबरोबर संकलन केंद्रातील दुधाचे नमुने घेतले गेले. मात्र येथील अन्न प्रशासनाने फक्त दूध विक्री होणार्‍या डेअरीतूनच दुधाचे नमुने घेतले. संकलन केंद्रातील दुधाचे नमुने घेतले गेले नाही. याठिकाणी मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे यापूर्वी केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. दरम्यान, यापुढील मोहिमेत संकलन करणार्‍या केंद्रांतून दुधाचे नमुने घेतले जातील, असे अन्न प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

खराब पनीर व बटर सदृश पदार्थ
अन्न प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी डावरे गल्लीतील साई डेअरी येथे तपासणी केली असता त्यांना तेथे खराब पनीर व मुदतबाह्य बटर सदृश पदार्थाचे पॅकेट मिळून आले. ते त्यांनी ताब्यात घेतले असून त्याचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोग शाळेत पाठविले गेले आहेत. त्यात भेसळ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अन्न प्रशासन अधिकार्‍यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...