Friday, June 14, 2024
HomeUncategorizedभेसळयुक्त हलवा, बर्फी जप्त

भेसळयुक्त हलवा, बर्फी जप्त

औरंगाबाद – Aurangabad

- Advertisement -

सणासुदीच्या दिवसांत भेसळयुक्त खव्यापासून तयार केलेली मिठाई तयार करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गोदामावर (LCB) गुन्हे शाखा पोलिसांनी (Police) आणि अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी भेसळयुक्त खव्यापासून तयार केलेला 281 किलो हलवा, 68 किलो बर्फी असा एकूण 55 हजार 591 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त रवींद्र साळोखे (Assistant Commissioner Ravindra Salokhe) यांनी दिली.

संजयनगर बायजीपुरा असलेल्या एका गोदामात बनावट खव्यापासून मिठाई तयार करण्यात येवून ती सणासुदीच्या दिवसांत विक्री करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त रवींद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलिस अंमलदार सुधाकर मिसाळ, रवींद्र खरात, सुनील बेलकर, विजय पिंपळे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी रोडे आदींनी सोमवारी सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी बनावट खव्यापासून तयार केलेला हलवा, बर्फी असा 55 हजार 591 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बनावट खव्याचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या