Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रधक्कादायक! अंध विद्यालयातील मुलांना अन्नातून विषबाधा

धक्कादायक! अंध विद्यालयातील मुलांना अन्नातून विषबाधा

मुंबई | Mumbai

अंध विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा (Food poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे…

- Advertisement -

ताडदेव (Taddev) परिसरातील व्हिक्टोरिया मेमोरियल अंध विद्यालयातील (Victoria Memorial School for the Blind) ही घटना असून येथील सात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

रेल्वे इंजिनवर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मंगळवारी दुपारच्या सुमारास काही विद्यार्थ्यांना उलट्या तर, काही विद्यार्थ्यांच्या पोटात वेदना जाणवू लागल्याने ही बाब उघडकीस आली. यापैकी सात विद्यार्थ्यांना त्रास जास्त जाणवू लागल्यामुळे त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) नायर रुग्णालयात (Nair Hospital) दाखल करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

तर सात मुलांपैकी दोन मुले १२ वर्षाखालील आहेत. दोन मुलांना उलट्या आणि तापही आल्याचे समजते. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले असून त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनिकेत राऊत (१५), कल्पेश पवार (११), सुमित सरकार (११),  सोमनाथ (१४), अक्षय मोनिस्वारे (१४), सदाफ कुरेशी (१७) , परमेश्वर (१८) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘प्रवरे’च्या आजी-माजी संचालकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन...