Saturday, July 27, 2024
Homeनगरखडकेवाकेत अन्नतंत्रज्ञान तर संगमनेरात कृषी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता

खडकेवाकेत अन्नतंत्रज्ञान तर संगमनेरात कृषी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता

अहमदनगर (प्रतिनिधी)

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रवरानगर येथील ग्रामीण शिक्षण संस्थेस राहाता तालुक्यातील खडकेवाके येथे नवीन अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय तर संगमनेरातील अमृतनगर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे नवीन कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अटींवर मान्यता देण्यात आली आहे. दोन्ही महाविद्यालयांमुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

- Advertisement -

नवीन अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय सुरू होण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर कृषी महाविद्यालयासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाठपुरावा केला होता. त्यास यश आले. दोन्हीही खासगी कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्वावर ही परवानगी देण्यात आली आहे. या दोन्हीही अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 पासून सुरू होत आहे.

खडकेवाकी येथील अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयासाठी 40 विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष प्रवेश मिळणार आहे. अमृतनगर येथील नवीन कृषी महाविद्यालयात 60 विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी प्रवेश मिळणार आहे. या नवीन महाविद्यालयांना विद्यापीठ तपासणी समितीच्या अहवालातील निष्कर्षात नमूद बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.शिक्षण पदवी अभ्यासक्रमाची शुल्क निश्‍चिती शुल्क नियामक प्राधिकरण तसेच शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या प्राधिकरणामार्फत विहीत करण्यात येतील. तसेच राज्य शासनाने वेळोवेळी निश्‍चित केेलेली मार्गदर्शक तत्वे व निकष खाजगी विना अनुदानित पदवी अभ्यासक्रमासाठ लागू राहतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या