Tuesday, March 25, 2025
HomeUncategorizedKumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामांचे सूक्ष्म नियोजन करावे - मुख्य सचिव सुजाता...

Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामांचे सूक्ष्म नियोजन करावे – मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची सूचना

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

नाशिक येथे सन २०२७-२८ या वर्षात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था, नियोजित साधूग्राम, नागरिकांची सुरक्षा आणि घनकचरा व्यवस्थापन या संदर्भातील कामांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन नियोजित आराखडा सादर करावा, अशा सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंगळवारी येथे दिल्या.

- Advertisement -

सन २०२७-२८ या वर्षात नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीबाबात सौनिक यांनी आज मंत्रालयात उच्चस्तरीय समितीची बैठक घेतली. त्यावेळी बोलताना सौनिक म्हणाल्या, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा लक्षात घेऊन पायाभूत सोयीसुविधांची कामे, साधूग्राममध्ये साधू-महंताची निवासव्यवस्था, वाहनतळ उभारणे, नागरिकांची सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, परिसर सुशोभीकरण, गोदावरी नदी आणि उपनद्या संवर्धन, शुद्धीकरण तसेच सुशोभीकरण, ग्रीन झोन, गर्दीचे सनियंत्रण, आरोग्य आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर अनुषंगिक कामे याबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर बैठका घेऊन कामे अंतिम करून त्याचा आराखडा राज्यस्तरावर सादर करावा.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा आणि राज्यस्तरावरील कामांचा आढावा घेण्यासाठी ठराविक कालावधीत बैठका आयोजित केल्या जाव्यात. सर्व यंत्रणांना सोबत घेऊन काम करावे. या कामांबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, जेणेकरून नियोजित कामांमध्ये आवश्यक तिथे सुधारणा करण्यासाठी मदत होईल, अशा सूचनाही सुजाता सौनिक यांनी दिल्या.

या बैठकीत नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठीच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले. बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, नगरविकास विभाग- १ चे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, नगरविकास विभाग- २ चे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोंविदराज, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...