श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील काष्टी येथे पुणे जिल्ह्याच्या दौंड येथिल तीन माहिलांनी गावातील एक गरीब कुटुंबात जाऊन आमच्या धर्मात प्रवेश करा मुलाचे लग्न होईल, घरातील समस्या दूर होतील असे सांगून कपाळावर तेल लावले आहे. तसेच इच्छा नसताना आमच्या धर्मात या अशी जबरदस्ती केल्याने तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नागरीकांसह तक्रारदार मयूर मदरे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली आहे. प्रकाश मदरे (रा. झोपडपट्टी, काष्टी ता श्रीगोंदा) यांनीदिलेल्या तक्रारीनुसार मदरे हा तरुण आपल्या आई आणि भावासह काष्टी येथे राहत आहे. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास त्याच्या घरी तीन महिला आल्या. त्यांनी खिश्रन धर्मा बाबत त्यांच्या कुटुंबास महिती सांगीतली. त्यानंतर त्यांनी त्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्ही प्रवेश करा. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील असे त्यांनी सांगितले.
तुमच्या मुलाचे लग्न होईल, असे सांगुन त्याच्या व आईच्या कपाळाला तेल लावले. आणि येशुची प्रार्थना म्हणाल्या. त्यानंतर त्या महिला मदरे यांना ख्रिश्चन धर्मामध्ये येणेसाठी बळजबरी करु लागल्या, परंतु आम्ही इतर धर्मामध्ये जाण्यास तयार नाही असे त्या महिलांना समजवून सांगत होतो. यानंतर त्यांनी वाईट शिव्या शाप देण्यास सुरूवात केली. अखेर हा प्रकार मदरे याने प्रतिक पाचपुते यांना सांगितला. पाचपुते यांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवले. पोलीसांनी त्या मि हलांना ताब्यात घेतले. त्यानंतर घडलेल्या प्रकार बाबत पोलीस स्टेशन येथे येऊन माहिती दिली असल्याचे फिर्यादी यांनी म्हंटल आहे. याबाबत रात्री उशिरा पर्यंत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.