दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
सध्या महावितरणने (MSEDCL) कृषीपंपाची (Agricultural pump) थकीत वीजबीले (Electricity Bill) न भरल्यास वीजपुरवठा खंडीत (Power outage) करण्याची मोहिम सुरु केली आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये (farmers) संतापाची लाट पसरली असून महावितरण कपंनीने सक्तीची वसुली मोहिम त्वरीत थांबवून शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
थकीत वीजबीलाचे कारण पुढे करुन शेती विजपंपाचे कनेक्शन तोडले जात असून त्यामुळे रब्बी हंगामातील (rabbi season) शेती करणार्या शेतकर्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. शेतकर्यांना नेहमीच अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागत आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे शेतकर्यांना रब्बी हंगामातील पिकांना पाणी देता येत नाही. विहिरी व बोअरवेला पाणी असूनही केवळ विजेअभावी पिकांना पाणी देता देत नाही.
आर्थिकदृष्ट्या हतबल असलेल्या शेतकर्यांना वीजबीले (Electricity Bill) भरण्याची सक्ती केली जात आहे. दोन वर्षापासून करोना परिस्थितीमुळे शेतीमालाला पुरेसा भाव मिळालेला नाही. अतिवृष्टी (heavy rain) व अवेळी पडणार्या पावसामुळे टोमॅटो, द्राक्ष, गहु, हरभरा, भोपळे, कारले आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी बांधव शेती करीत आहे.
शेतीमधून उत्पादन खर्चही निघत नाही. अशा परिस्थितीत शासनाने शेतकर्यांना वीजबीले माफ करावीत. वीज भरण्यासाठी शेतकर्यांना सक्ती केली जात आहे. अशातच शेतकर्यांना वीजपंपाचा पुरवठा खंडीत करण्याचे काम महावितरण (MSEDCL) कंपनीकडून राबविले जात आहे. यावर्षी विहीरी, बोअरवेलला बर्यापैकी पाणी आहे. त्यामुळे शेतकर्यांनी महागडे बी-बियाणे घेऊन रब्बी पिकांची लागवड केली आहे.
पीक चांगल्या परिस्थितीत असतानाच महावितरण कंपनीने शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडीत आहे. विहिरीत पाणी असूनही पिकांना देणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहे. मुळात महावितरण कंपनीने जादा बिलांची आकारणी केली आहे.आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.