Thursday, May 15, 2025
Homeनगरट्रान्सपोर्टच्या टेम्पोतून विदेशी दारूची अवैध वाहतूक

ट्रान्सपोर्टच्या टेम्पोतून विदेशी दारूची अवैध वाहतूक

भिंगार पोलिसांच्या कारवाईत साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

विदेशी दारूची वाहतूक करणारा ट्रान्सपोर्टचा टेम्पो भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडला. विदेशी दारूचे बॉक्स व टेम्पो (एमएच 16 सीसी 8604) असा सहा लाख 64 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. टेम्पो चालक दत्तात्रय भाऊसाहेब गायकवाड (रा. वडुले बुद्रुक ता. शेवगाव) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोठला येथून छत्रपती संभाजीनगर रस्त्याने एका मालवाहु टेम्पोतून विदेशी दारूची विनापरवाना वाहतूक केली जाणार असल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली होती. सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने गुरूवारी (7 नोव्हेंबर) संशयित मालवाहू टेम्पो छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर मिलिटरी मस्जिद जवळ पकडला. पंचासमक्ष टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारूचे बॉक्स मिळून आले.

पोलिसांनी टेम्पो व दारूचे बॉक्स असा सहा लाख 64 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.सहायक पोलीस निरीक्षक मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माळोदे, अंमलदार दीपक शिंदे, रवी टकले, संदीप घोडके, समीर शेख, प्रमोद लहारे, अमोल आव्हाड यांच्या पथकाने सदरची कारवाई केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : सीसीटीव्ही लावा, सेवकांची मद्य चाचणी करा; राज्य सरकारची...

0
मुंबई | Mumbai  महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लहान मुलांचे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी राज्यातील शाळांसाठी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळांत सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे...