अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर शहरात कारवाई करत भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या विदेशी सिगारेट विक्री करणार्या व्यापार्यावर छापा टाकून पाच लाख तीन हजार रूपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी व्यापारी नरेश जयपालदास कटारिया (वय 42 रा. मिस्कीननगर, तारकपूर, अहिल्यानगर) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, प्रशांत राठोड यांचे पथक अवैध धंद्याची माहिती घेत असताना 11 मार्च रोजी मिळालेल्या माहितीवरून नरेश जयपालदास कटारिया याच्या राधास्वामी स्टोअर्स, कापडबाजार येथे छापा टाकण्यात आला. पोलिसांनी पंचासमक्ष दुकानाची झडती घेतली असता प्रतिबंधित विदेशी सिगारेट आढळून आले. त्याच्याकडून पाच लाख तीन हजार रुपयांचे सिगारेट जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत.