Saturday, April 26, 2025
Homeनंदुरबारआमलाड-बहुरूपा दरम्यान सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

आमलाड-बहुरूपा दरम्यान सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

मोदलपाडा | वार्ताहर nandurbar

तळोदा तालुक्यातील आमलाड ते बहुरुपा गावाजवळ ७ लाखांचा मद्यसाठा तळोदा पोलिसांनी जप्त केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना आमलाड ते बहुरूपा दरम्यान मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. त्यावेळी एका वाहनातून सुमारे ७ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार,

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, सपोनि अविनाश केदार, सागर गाडीलोहार, पुना पाडवी, पोना अजय पवार, पोना विलास पाटील, विजय जावरे, पो.शि.संदीप महाले, महिला एएसआय संगीता बाविस्कर यांच्या पथकाने केली. चालक वाहन सोडून फरार झाला आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...