Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारनंदुरबारात तीन लाख रुपयाच्या विदेशी दारुसह रोख रक्कम जप्त

नंदुरबारात तीन लाख रुपयाच्या विदेशी दारुसह रोख रक्कम जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

शहरातील बायपास रस्त्यावरील उड्डाणपुलाखाली नंदुरबार शहर पोलीस (police) ठाण्याच्या पथकाने २ लाख ९७ हजार ७८० रुपयांचा विदेशी मद्यसाठा असलेले बोलेरो वाहन जप्त केले आहे. पोलीसांना पाहून चालकाने वाहन दूर अंतरावर उभे करुन पळ काढला आहे. याप्रकरणी चालकासह दारु मालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन व रोख रकमेसह ६ लाख ७२ हजार ७८० रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

- Advertisement -

दि.३० जून रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना एक पांढर्‍या रंगाची महिंद्रा कंपनीचे बोलेरो चारचाकी वाहन (क्रमांक एमएच-१८-Aजे-०९९५) ही उमर्दे गावाकडून नंदुरबार शहराकडे अवैध दारू घेवून येणार आहे, अशी माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना कारवाईचे आदेश दिले.

श्री. कळमकर, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोकॉ अनिल बर्डे, पोकॉ युवराज राठोड, आदींच्या पथकाने शहरातील जगतापवाडी उड्डानपुलाच्या खाली उमर्दे रोडवर सापळा लावला. बोलेरो वाहन उड्डाणपुलाच्या खाली आल्यावर श्री. कळमकर यांनी थांबविण्याचा इशारा दिला.

परंतू चालकास संशय आल्याने काही अंतरावर वाहन उभे करून वाहन सोडून पळ काढला. त्याचा पोलीस पथकाने शिताफीने पाठलाग करून त्यास जागीच पकडले. शेख अदील शेख रऊफ (वय- २६ वर्षे, रा. गाझी नगर नंदुरबार),याला ताब्यात घेतले. पथकातील अधिकारी अंमलदारांनी संशयित वाहनाची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात बेकायदेशीर वाहतुक करीत असलेली दारू मिळून आली.

या वाहनात ३ लाख २५ हजार रुपये किंमतीची एक पांढ-या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो, १ लाख १५ हजार रुपये किंमती इम्पेरीयल ब्लू कंपनीच्या १८० एमएलच्या ७२० बाटल्या आढळून आल्या.

१ लाख ८ हजार रूपये किंमतीच्या मॅकडॉवल नं. १ कंपनीच्या १८० एमएलच्या ७२० बाटल्या, ५७ हजार ६०० रुपये किंमतीच्या ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या १८०एमएलच्या ३८४ बाटल्या, ९ हजार ३०० रुपये किंमतीच्या इम्पेरीयल ब्लू कंपनीच्या ६ बाटल्या, ७ हजार ६८० रुपये किंमतीच्या इम्पेरीयल ब्लू कंपनीच्या ७५० एमएलच्या १२ बाटल्या,

५० हजार रुपये रोख रक्कम तसेच ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे बोलेरे वाहन असा एकुण ६ लाख ७२ हजार ७८० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांना आढळून आला.

सदर मुद्देमाल, बोलेरो वाहन व रोख रक्कम ही पोलीसांनी कायदेशीर प्रक्रीया करून ताब्यात घेतली. सदर दारू कोणाची आहे? याबाबत आरोपीत यास विचारणा केली असता ती अरूण चौधरी रा. नंदुरबार यांची असल्याची सांगितले. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात शेख अदील शेख रऊफ, अरूण चौधरी यांच्याविरुध्द गुरजि.नं. ५७५/२०२३, महाराष्ट्र दारुबंदी कायदा अधिनियम कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, पोकॉ अनिल बर्ड़े, पोकॉ युवराज राठोड, यांच्या पथकाने केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या