Friday, May 3, 2024
Homeनाशिकपोलिसांच्या धर्तीवर वन गुन्हे नोंद; वनविभागातून जुनी पद्धती हद्दपार

पोलिसांच्या धर्तीवर वन गुन्हे नोंद; वनविभागातून जुनी पद्धती हद्दपार

  • तीन पानांचा नवा पीओआर

  • दोषींना कठोर शासन

    - Advertisement -

नाशिक । Nashik (भारत पगारे)

वन विभागात ब्रिटिशकालीन 80 वर्षे जुने प्राथमिक वन गुन्हा अहवाल (पीओआर) आता हद्दपार करण्यात आले आहे. आता पोलिसांच्या धर्तीवर वन गुन्हा नोंदवला जाणार असून, न्यायालयात वन गुन्ह्याप्रकरणी दोषींना कठोर शासन होईल, असे तीन पानांचे पीओआर असणार आहे.

सन 1940 पासून वन गुन्हे नोंदवण्याची ब्रिटिशकालीन पद्धत आहे. ती आजतागायत सुरू आहे. मात्र, या जुन्या पद्धतीमुळे वन गुन्ह्यांची सविस्तर माहिती पीओआरमध्ये नमूद करणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक गंभीर स्वरुपाचे वन गुन्हे घडल्यानंतरही दोषी निर्दोषमुक्त होत असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले.

वनमंत्री संजय राठोड यांनी वन खात्यातील पीओआरमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. पोलीस खात्याप्रमाणे गुन्ह्याच्या प्रथम अहवाल (एफआयआर) याप्रमाणे वन गुन्ह्याचा पीओआर असणार आहे. तोदेखील मराठीतून असेल. जंगलात वनकर्मचारी कर्तव्यावर असताना वन गुन्हा घडल्यास त्याला तीन पानांचा पीओआर जारी करावा लागेल. यात झालेल्या एकूणच वन गुन्ह्यांची सविस्तर माहिती नमूद करावी लागणार आहे.

चांद्यापासून तर बांध्यापर्यंत वनकर्मचार्‍यांना नव्या पद्धतीने वन गुन्हा दाखल करावा लागणार आहे. वन खात्यात नव्या पद्धतीने प्राथमिक वन गुन्हा रिपोर्ट (पीओआर) लागू करण्याच्या अनुषंगाने वनमंत्री संजय राठोड, वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी आढावा घेतला. त्याअनुषंगाने नुकतीच वरिष्ठ वनाधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली.

जुने पीओआरमध्ये आमूलाग्र बदल करून नव्याने तीन पानांच्या पीओआरनुसार अंमबजावणी करण्याविषयी शिक्कामोर्तब झाले. फेब्रुवारी अथवा मार्च 2021 पासून वनविभागात नव्या पीओआरनुसार वन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

सध्या वन गुन्हे नोंदवण्यासाठी वनविभागात ‘वन अपराध पहिले प्रतिवृत्त’ या सदराखाली प्रपत्र उपयोगात येते. या प्रपत्रास कुठे ‘एफओआर’ (फर्स्ट ऑफेन्स रिपोर्ट) तर कुठे ‘पीओआर’ (प्रीलिमिनरी ऑफेन्स रिपोर्ट) म्हणून संबोधले जाते. ही पद्धत ब्रिटिशकाळापासून वापरली जात असून गेल्या 80 वर्षांपासून प्रचलित आहे.

नव्या बदलानुसार…

वन गुन्हा घडल्यास तीन पानांचा ‘पीओआर’ जारी

वन गुन्ह्यांची सविस्तर माहिती, आरोपीचा तपशील, अपराधाची कलमे व अधिनियमांची नोंद.

सर्वत्र या एकाच पद्धतीने वनगुन्हे नोंद आवश्यक

पीओआरमधील बोजड शब्द वगळणार

प्रचलित व सहज समजणार्‍या शब्दांचा वापर

- Advertisment -

ताज्या बातम्या