नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikrod
दोन निष्पाप बालकांचे बळी घेणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तब्बल 18 पिंजरे व 15 ट्रॅप कॅमेरे वनविभागाच्या वतीने वडनेर दुमाला आर्टिलरी सेंटर रोड परिसर पिंपळगाव खांब विविध गाव दाढेगाव आदी भागात लावण्यात आले आहे
वनविभागाने केलेली कार्यवाही पुढील प्रमाणे
लावलेले ट्रॅप कॅमेरे: 15
थर्मल ड्रोन: 02
बिबट्याला बेशुद्ध करणे कामी Tranquilization Gun, औषधे व अत्याधुनिक साधनसामग्रीसह 02 पथके तैनात करण्यात आली आहेत.
परिसरात माग काढणेकामी शोध मोहीम संगमनेर रेस्क्यू टीमचे श्वानपथकसह नाशिक वनपरिक्षेत्राचे बचाव पथक
सदर परिसरात बिबट्याचे अस्तित्व असलेल्या ठिकाणी पिंजरे लावणे कामी स्वतंत्र पथक, पिंजऱ्यात भक्ष्य ठेवणे व वेळोवेळी पिंजऱ्याची पाहणी करणेकामी पथक
पिंजरे लावलेल्या ठिकाणी तसेच बिबट्याच्या पाऊलखुणांच्या आधारे ट्रॅप कॅमेरे लावणेकामी WCS- India टीम व फिरते पथक वणीचे कर्मचारी
आर्टिलरी सेंटर परिसर व आजूबाजूच्या गावात जनजागृती गस्त करणे कामी स्वतंत्र पथक
सहभागी पथके:
नाशिक वनपरिक्षेत्र वन्यप्राणी बचाव पथक.
रेस्क्यू नाशिक डिव्हिजन.
संगमनेर रेस्क्यू टीम
WCS-India टीम
फिरते पथक, नाशिक
फिरते पथक, वणी
फिरते पथक, पेठ
पश्चिम नाशिक वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी
आर्टिलरी सेंटर, नाशिक यांचे अधिकारी व जवान
एकूण अधिकारी कर्मचारी संख्या : 90
आर्टिलरी सेंटर, चे उच्चस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचे सदर मोहिमेत सर्वप्रकारे मोलाचे सहकार्य मिळत आहे. ही कार्यवाही मुख्य वनरक्षक जी मल्लिकार्जुन उपवन संरक्षक सिद्धेश सावर्डेकर सहाय्यक वनसंरक्षक प्रशांत खैरनार वन परिच्छेत्र अधिकारी सुमित निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे.




