Wednesday, May 20, 2026
HomeनगरCrime News : वन कर्मचार्‍याला झाडाला बांधून चंदनाची चोरी

Crime News : वन कर्मचार्‍याला झाडाला बांधून चंदनाची चोरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर शहरातील वन विभागाच्या मुख्य कार्यालय परिसरातून चंदनाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (18 एप्रिल) पहाटे ही घटना घडली. वन विभागाच्या कर्मचार्‍याला बेदम मारहाण करून झाडाला बांधून ठेवले आणि साधारण 20 हजार रुपये किमतीची चंदनाची लाकडे लंपास केली.

- Advertisement -

दरम्यान या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्मचारी रमेश पोपट शेळके (वय 58 रा. गुंडेगाव, ता. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. रमेश शेळके हे कर्तव्यावर असताना शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. रमेश शेळके हे वन विभाग कार्यालय परिसरात रखवाली करत असताना चार अनोळखी व्यक्तींनी तिथे प्रवेश केला.

आरोपींनी शेळके यांना पकडून हाताने व चापटीने मारहाण करत धमकावले. त्यानंतर त्यांना एका झाडाला घट्ट बांधून ठेवले, जेणेकरून ते प्रतिकार करू शकणार नाहीत. यानंतर आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तिथून चंदनाची झाडे तोडून त्यांची लाकडे चोरून नेली. भिंगार कॅम्प पोलिसांनी या प्रकरणी बीएनएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पवार करत आहेत.

ताज्या बातम्या

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या नुकसान भरपाईसाठी राज्यस्तरीय समिती

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे, मॅनहोल यामुळे होणारे अपघात आणि मृत्यू प्रकरणी नुकसानभरपाई देण्याच्या संदर्भात विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या...