Friday, December 13, 2024
HomeनाशिकNashik News : पाथर्डी परिसरात बिबट्या जेरबंद

Nashik News : पाथर्डी परिसरात बिबट्या जेरबंद

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

पाथर्डी परिसरातील (Pathardi Area) गट नंबर २१६ मध्ये आज गुरुवार (दि.२३ नोव्हेंबर) रोजी पहाटेच्या सुमारास संजय गंगाराम नवले यांच्या मळ्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात (Cage) बिबट्या (Leopard) जेरबंद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील पंधरा-वीस दिवसांपासून बिबट्या या परिसरात फिरत होता. त्यामुळे मळेधारकांनी व ग्रामस्थांनी याची कल्पना वनविभागाला दिली होती. वनविभागानेही (Forest Department) बिबट्याच्या पायाचे ठसे लक्षात घेऊन पिंजरा लावलेला होता. तरीही मळे परिसरात राहत असलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) बिबट्याची भीती जाणवत होती. त्यामुळे वनविभागाने गांभीर्याने ही बाब लक्षात घेऊन त्याच्यावर पाळत ठेवली होती.

Weather Update : राज्यातील ‘या’ भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

तसेच या भागातील बरेच (मनुष्यवस्ती) शेतकरी मळे भागात राहत असल्याने त्यांच्या लहान मुलांना शाळेत जावे लागते. तसेच महिलांना (Women) दिवसभरात शेतामध्ये काम करावे लागते. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याची भीती मळेभागात राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरली होती. त्याच अनुषंगाने वनविभागाने दोन-तीन दिवसांपूर्वी नवले यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता.

दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी (Leopard Rescue) वनविभागाचे विजय पाटील, अनिल अहिरराव, अशोक खानझोडे व इतर सहकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर वनविभागाने बिबट्याला जेरबंद केल्याने मळेधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Manoj Jarange Patil : “२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास…”; जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या