देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp
येथील सह्याद्रीनगर भागात विठ्ठल गावंडे यांच्या मळ्यातील मोकळ्या जागेत आठ दिवसापूर्वी लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला असून त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती…
कॅन्टोन्मेंट बोर्ड वाडॅ क्र. 7 मधील शिंगवेबहुला, सह्याद्रीनगर, गांवडे मळ्यातील विठ्ठल गावंडे यांच्या पाळीव कुत्र्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
Trimbakeshwar News : दुगारवाडी धबधब्यात पर्यटक गेला वाहून; शोधमोहीम सुरू
याबाबत स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन याठिकाणी पिंजरा लावला होता. आठ दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
सप्तशृंगी गडावर सुरक्षा बलाच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल