Monday, June 24, 2024
Homeनगरवन प्राणी गणनेसाठी फॉरेस्ट सज्ज !

वन प्राणी गणनेसाठी फॉरेस्ट सज्ज !

वैशाख पौर्णिमेला वन प्राण्यांची गणना

- Advertisement -

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वन विभागाच्या वतीने वैशाख पौर्णिमेला वन प्राण्यांची गणना केली जाते. या गणनेसाठी वन विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातील अभयारण्यासह वन विभागाच्या ठिकाणी ही प्राणी गणना केली जाणार आहे. वन विभागाच्यावतीने दरवर्षी वैशाख पौर्णिमेला वन प्राण्यांची गणना केली जाते. प्रमुख पाणवठ्याच्या ठिकाणी वन विभागाच्यावतीने उंच ठिकाणी झाडांच्या बांध्यावर किंवा टेकडीवर झाडांच्या फांद्यांच्या सहाय्याने अडोसा निर्माण केला जातो. त्यामध्ये वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच काही पर्यावरण मित्र स्वयंसेवक म्हणून थांबतात. वैशाख पौर्णिमेला दिवसा आणि रात्री किती वन्य प्राणी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आले. त्याची गणना केली जाते. वन प्राण्यांच्या वेगवेगळ्या वर्गवारीतील किती प्राणी आले. त्यांची गणना केली जाते.

वन विभागाकडे आतापर्यंत दिडशे पर्यावरण प्रेमी नागरिकांनी वन प्राणी गणनेत सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक म्हणून अर्ज सादर केले आहेत. या अर्जाची छाननी केली जाणार आहे. पर्यावरण क्षेत्रामध्ये केलेल्या कामाचा अनुभव लक्षात घेतला जाईल. त्यांना यामध्ये सहभागी करून घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती नगरचे उपवन संरक्षक यांच्या कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या