दिल्ली । Delhi
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि आसाम आंदोलनातील प्रमुख नेते भृगु कुमार फुकन यांच्या 28 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. रविवारी सकाळी गुवाहाटीच्या घारगुल्ली परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.
उपासा फुकन यांनी आपल्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं. सुरुवातीला हा अपघात असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपासा फुकन या माजी मंत्री भृगू कुमार फुकन यांच्या एकुलत्या एक मुली होत्या. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्या आपल्या आईसोबत गुवाहाटीतील घारगुल्ली परिसरात राहत होत्या. रविवारी सकाळी त्यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीय आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे.
उपासा फुकन यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांचे वडील भृगु कुमार फुकन हे आसाम आंदोलनातील प्रमुख नेते आणि माजी गृहमंत्री होते. त्यांच्या पश्चात उपासा आणि त्यांची आई असे कुटुंब होते.
आत्महत्येच्या या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू असून, उपासा फुकन यांच्या आत्महत्येचे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. मानसिक तणाव किंवा कोणत्याही वैयक्तिक अडचणींमुळे त्यांनी हे पाऊल उचलले का, याचा शोध घेतला जात आहे.