Wednesday, July 24, 2024
Homeमुख्य बातम्याआंध्र प्रदेशात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा! माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक;...

आंध्र प्रदेशात मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा! माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक; नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

आंध्रप्रदेशच्या (Andhra Pradesh) राजकारणात मध्यरात्री एक मोठी घडामोड घडली असून तेलगू देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू (N Chandrababu Naidu) यांना पोलिसांनी शनिवारी( ९ सप्टेंबर) रोजी पहाटे नंद्याल जिल्ह्यातून (Nandyal District) अटक (Arrested) केली आहे…

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चंद्राबाबू नायडू यांच्यावर स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये (Skill Development Corporation) गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये नायडू यांच्यावर हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. तब्बल २५० कोटींच्या घरात या घोटाळ्याचा आकडा असून चंद्राबाबू नायडू या प्रकरणात आरोपी क्रमांक एक असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर याप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) आज शनिवारी पहाटेच्या सुमारास नायडू यांना आंध्रप्रदेशमधील नंदयाला येथून अटक केली आहे.

दरम्यान, सीआयडीने मध्यरात्री उशीरा अटक वॉरंट दिल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह खुद्द चंद्राबाबू नायडूंनीही अशा प्रकारे आपल्याला अटक केली जाण्याला विरोध केला. मात्र, अखेर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली असून आता वैद्यकीय तपासणीनंतर चंद्राबाबू नायडूंची रवानगी तुरुंगात होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधूनच त्यांना अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशच्या नंदयाल शहरात एका सभेसाठी शुक्रवारी संध्याकाळी उपस्थित होते. रात्री सभा संपवून ते आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसले असताना त्यांना सीआयडीने त्यांचे अटक वॉरंट सोपवले. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांसह खुद्द चंद्राबाबू नायडूही संतप्त झाले. आपण एक माजी मुख्यमंत्री आहोत, आपल्याला एनएसजीचे संरक्षणही आहे. अशा प्रकारे ही अटकेची कारवाई कशी होऊ शकते? असा जाब त्यांनी विचारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या