Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्यासोनिया गांधींची प्रकृती खालवली, दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

सोनिया गांधींची प्रकृती खालवली, दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

दिल्ली | Delhi

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालवल्याने त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ताप आल्यानंतर गुरुवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.

- Advertisement -

सर गंगाराम रुग्णालय प्रशासनाने माहिती देत सांगितलं आहे की, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रुग्णालयात सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या विविध चाचण्या सुरू आहेत, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितलं आहे. सोनिया गांधी यांना ताप आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी शुक्रवारी दिली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडेंवर प्राणघातक हल्ला

सोनिया गांधी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्या सध्या ७६ वर्षांच्या आहेत. त्यांना गुरुवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे. चेस्ट मेडिसिन विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. अरुप बसू यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम त्याच्यावर उपचार करत आहे.

इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने गर्लफ्रेंडशी केला साखरपुडा; कधीकाळी विराट कोहलीला केलं होतं प्रपोज

सोनिया गांधी यांना गत जानेवारी महिन्यातही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले होते. जवळपास आठवडाभर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली होती. त्यावेळी भारत जोडो यात्रेत व्यस्त असणारे राहुल गांधीही पदयात्रा सोडून दिल्लीला पोहोचले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या