जामखेड । तालुका प्रतिनिधी
जामखेड येथील नृत्यांगना दिपाली पाटील हिने साई लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. याप्रकरणी तिला आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्याविरुद्ध जामखेड पोलिसात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांची पत्नी लता संदीप गायकवाड या नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक पाच मधून भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या आहेत. त्यांच्याच पतीविरुद्ध अशा प्रकारचा गुन्हा घडल्याने जामखेड शहरात खळबळ उडाली आहे तसेच भाजपा च्या नेत्यांना ‘धक्का ‘ बसला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, मैत्रिणींना बाजारात जाते असं सांगून बाहेर पडलेल्या दिपाली पाटील परत न आल्याने मैत्रिणींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. आमदार रोहित पवारांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्या नंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली आणि दिपाली हीस आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा संदीप गायकवाड यांच्याविरुद्ध दाखल केला.
ही घटना गुरुवार तारीख ०४ रोजी घडली आणि या संदर्भातील गुन्हा शुक्रवार तारीख ०५ रोजी दाखल झाला. या घटनेमुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली असून निवडणुकीत आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या उमेदवारांवर गुन्हेगार प्रवृत्तीचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात भाजपाने उभे केले आहेत असा आरोप जाहीरपणे अनेक वेळा केला आणि निवडणूक संपताच दुसऱ्याच दिवशी खळबळ जनक घटना घडली आणि आरोपाच्या आरोपीच्या पिंजऱ्यात भाजपाच्या उमेदवाराचा पती माझी नगरसेवक अलगद जाऊन अडकला.
जामखेड येथे एका नृत्यांगनेने साई लॉजमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. मैत्रिणींना बाजारात जाते असं सांगून बाहेर पडलेल्या दिपाली पाटील परत न आल्याने मैत्रिणींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला असून रोहित पवारांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील या काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होत्या. गुरुवारी सकाळी त्या मैत्रिणींना ‘मी बाजारात जाऊन येते’ असं सांगून बाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या परत न आल्याने मैत्रिणींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. ज्या रिक्षाने त्या साई लॉजपर्यंत गेल्या होत्या, त्या रिक्षाचालकाकडून चौकशी केली असता त्याने त्यांना लॉजमध्ये सोडल्याचं सांगितलं. सायंकाळी मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की रूम आतून बंद होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपाली यांनी पंख्याला गळफास घेतल्याचं धक्कादायक दृश्य दिसलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
या प्रकरणी दिपालीची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे हिने दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. यासंदर्भात जामखेड तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात वेगळा सोशल व्यक्त केला आणि पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली.
आमदार रोहित पवार यांना वेगळाच संशय..
रोहित पवारांना वेगळाच संशय आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे,जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही. अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (३५) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.
दरम्यान रोहित पवार यांनी आणखी एक पोस्ट केली केली असून, त्यात त्यांनी म्हंटले आहे कि, “अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळं तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली. या घटनेमुळे भाजपचा खरा चेहरा पुढं आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपने नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली..
हिच आहे #party_with_difference भाजपा. आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा. एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईने लक्ष राहील.”




