Tuesday, March 25, 2025
HomeनाशिकEknath Shinde : एकनाथ शिंदेंचा नाशिकमध्ये मनसे, काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का;...

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा नाशिकमध्ये मनसे, काँग्रेस आणि ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

नाशिक | Nashik

राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळविल्यानंतर सरकार देखील स्थापन केले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) माजी आमदारांसह पदाधिकारी प्रवेश करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कमकुवत होतांना दिसत आहे. यात खासकरून ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसला (Congress) मोठ्या प्रमाणावर गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

दोन दिवसांपृवी काँग्रेसच्या प्रवक्त्या व माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील (Hemlata Patil), नाशिकरोडच्या ठाकरे गटाच्या चार वेळेस नगरसेविका असलेल्या माजी उपमहापौर, व्यापारी बँकेच्या संचालिका रंजना बोराडे (Ranjana Borade) आणि सिडकोतील दीपक दातीर (Deepak Datir) यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिंदेंनी नाशकात शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि मनसेला धक्का दिला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या ठाण्यातील शुभ-दिप निवासस्थानी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक व सभापती पवन पवार आणि मनसेचे (MNS) माजी नगरसेवक व सभापती योगेश शेवरे आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदना पाटील यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना उपनेते तथा नाशिक जिल्हासंपर्क प्रमुख विजय (अप्पा) करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू (अण्णा) लवटे, महानगर प्रमुख प्रविण (बंटी) तिदमे, विक्रम नागरे, अभय महादास यांच्यासह आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, उद्या (शुक्रवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार दौऱ्यासाठी नाशिकमध्ये (Nashik) येत असून त्यांच्या उपस्थितीत बडे प्रवेश होणार असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गटाच्या) पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे, विरोधी पक्षांत कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. तसेच नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर शिंदेंची जाहीर सभा देखील होणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...