Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडामाजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात

माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीचा अपघात

राजस्थान। Rajasthan

भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला बुधवारी सकाळी राजस्थान येथील सवाई माधोपुर येथे भीषण अपघात झाला

- Advertisement -

या अपघातात त्यांची कार रस्त्यालगतच्या ढाब्यात शिरून उलटली होती. मात्र या अपघातातून अझरुद्दीन बालंबाल बचावले आहेत. तसेच त्यांची कुटुंबियातील सदस्यही सुखरूप असल्याची माहिती मिळते आहे.

या अपघातातून अझरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. लालसोट कोटा मेगा हायवेवर असलेल्या सुरवाल पोलीस ठाण्याजवळ हा अपघात झाला आहे. अझरुद्दीन त्यांच्या कुटुंबीयांसह रणथंबोरला जात होते. अझरुद्दीन यांच्यासोबत आलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. अझरुद्दीन यांना दुसऱ्या कारने हॉटेलमध्ये नेण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अझहर आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राथमिक उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे ते ठीक असल्याचे समजताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर जखमी प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि प्रथमोपचारानंतर त्याला सोडण्यात आले.

अझरुद्दीन हे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. सप्टेंबर 2019 मध्ये ते या पदावर निवडून आले होते. इतकंच नाहीतर 2014 मध्ये राजस्थानमधील टोंक-सवाई माधोपूर मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूकही लढवली होती. पण भाजपाचे सुखबीरसिंग जौनापूरियाकडून त्यांचा पराभव झाला. यापूर्वी ते उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद मतदारसंघाचे खासदारही होते. क्रिकेट विश्वात अझरुद्दीन यांनी मोठं यश मिळवलं आहे. त्यांनी 47 कसोटी आणि 174 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. तीन विश्वचषकातही ते भारताचे प्रमुख होते. पण नंतर मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्दीला ब्रेक लागला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या