Friday, November 22, 2024
HomeराजकीयNashik News : भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांचा ठाकरेंच्या...

Nashik News : भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

लोकसभा निवडणूकीच्या (Loksabha Election) पार्श्‍वभूमीवर अंतर्गत वादामुळे भाजप युवा मोर्चाचे नाशिक जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे (Yogesh Barde) यांनी राजीनामा देत भाजपच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांच्याविरोधात प्रचार करत त्यांच्या पराभवात खारीचा वाटा उचलला होता. यानंतर आता बर्डे यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला असून शिवसेनेचे उपनेते खा.संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर घेतलेला हा प्रवेश चर्चेचा विषय ठरत आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sanjay Raut : महाविकास आघाडीचे जागावाटप कधी जाहीर होणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Dindori APMC) उपसभापती योगेश बर्डे यांनी भाजपमध्ये तत्कालिन खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार (Bharati Pawar) यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करत भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत डॉ. पवार यांच्या पराभवाचा विडा उचलला होता. विरोधी प्रचारात सक्रीय सहभाग नोंदवत भाजप उमेदवार डॉ.भारती पवार यांच्याविरोधात रोष व्यक्त केला होता. निवडणूकीनंतर ते इतर पक्षात प्रवेश करतील, असे संकेत दिले जात होते.अखेर शिवसेनेचे उपनेते खा. संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात जाहीर प्रवेश केला.

हे देखील वाचा : आदिमायेचा आजपासून जागर; सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सव, आज घटस्थापना

दरम्यान, यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हा संघटक सतिश देशमुख, तालुकाप्रमुख पांडूरंग गणोरे, जयराम डोखळे, अ‍ॅड. विलास निरघुडे, सचिन बर्डे, प्रभाकर जाधव, नीलेश शिंदे, अरुण गायकवाड, गोविंद भालेराव, सुनील पवार, बाळू निसाळ, गोटीराम बर्डे, भगवंत बर्डे, सुनील बोराटे, श्रीराम आहेर, शरद बर्डे, केशव पाचोरकर, नितीन हळदे, अभिषेक काकड, तनय उफाडे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या प्रवेशामुळे दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या