Wednesday, July 24, 2024
Homeक्रीडाविश्वचषक सोहळा सुरु असताना आली वाईट बातमी; बिशनसिंग बेदी यांचे निधन

विश्वचषक सोहळा सुरु असताना आली वाईट बातमी; बिशनसिंग बेदी यांचे निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

भारतामध्ये वर्ल्ड कप २०२३ चे आयोजन करण्यात आलेले असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi Passes Away) यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. १९७० च्या दशकामध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रेट चौघांमध्ये बिशन सिंग बेदी यांचा समावेश होता.

बिशन सिंग बेदींबरोबरच प्रसन्ना, चंद्रशेखर आणि राघवन यांचा या सर्वोत्तम ४ फिरकीपटूंमध्ये समावेश होता. बिशन सिंग बेदी यांनी भारतासाठी ६७ टेस्ट खेळल्या. १९६७ ते १९७९ या कालावधीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना बिशन सिंग बेदी यांनी टेस्टमध्ये २६६ विकेट घेतल्या. याशिवाय १० वनडेमध्ये त्यांना ७ विकेटही घेतल्या आहेत. बिनश सिंग बेदींनी २२ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व केले.

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी प्रथम उत्तर पंजाबसाठी खेळले, जेव्हा ते फक्त पंधरा वर्षांचे होते आणि १९६८-६९ मध्ये ते दिल्लीला गेले आणि १९७४-७५च्या रणजी करंडक स्पर्धा त्यांनी गाजवलीव ६४ बळी घेतले. बेदी यांनी अनेक वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६० विकेट्ससह आपली कारकीर्द पूर्ण केली.

बिशन सिंह बेदी यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. बिशन सिंह बेदी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द एका दशकाहून मोठी होती. त्यांनी सुमारे १२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या