Wednesday, May 29, 2024
Homeदेश विदेशभारतीय नौदलाचे ते ८ अधिकारी कोण? कतारने फाशीची शिक्षा का सुनावली? त्यांच्यावर...

भारतीय नौदलाचे ते ८ अधिकारी कोण? कतारने फाशीची शिक्षा का सुनावली? त्यांच्यावर कोणते आरोप ठेवण्यात आले?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

कतारमध्ये (Qatar) एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना (Indian Navy Officers Death Penalty)कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या वर्षी २९ मार्च रोजी त्यांच्याविरोधातील खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी (२६ ऑक्टोबर) एक निवेदन जारी करून या निकालाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

- Advertisement -

या अधिकाऱ्यांवर कतारच्या सबमरीन प्रोजेक्टशी संबंधित माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप करण्यात आलाय. कतारची वेबसाइट अल-जजीराने ही माहिती दिलीय. या अधिकाऱ्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आश्चर्य व्यक्त केलय. भारत सरकार या सर्व माजी नौदल अधिकाऱ्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देण्याबद्दल विचार करतेय.

मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक; नांदेडमध्ये खासदारांच्या ताफ्यातील गाड्या फोडल्या

दरम्यान, “भारताच्या आठ माजी नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचा निर्णय अनपेक्षित असून, आम्ही तपशीलवार निकालाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करू”, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.

आठवड्यातून किमान ७० तास काम करण्याचा नारायण मुर्तींचा सल्ला; सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

नौदलाच्या ज्या माजी अधिकाऱ्यांना कतारच्या कोर्टाने हेरगिरीच्या आरोपात शिक्षा सुनावलीय ते कोण आहेत? कतारला कसे गेले? हे जाणून घेणे आवश्यक आहे. भारतीय नौदलातील सेवाकाळात या अधिकाऱ्यांवर कुठलाही डाग नव्हता. त्यांनी २० वर्ष काम केलय. महत्वपूर्ण पद भूषवली. त्यानंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर चांगल्या संधीच्या शोधात कतारची प्रायव्हेट कंपनी अल दहारा सोबत काम सुरु केले. अल दहारा कंपनीत हे अधिकारी मागच्या काही वर्षांपासून कतारच्या नौदल अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देत होते.

आठही जणांना कतारी गुप्तचर यंत्रणा स्टेट सिक्युरिटी ब्युरोने अटक केली होती; ज्याची माहिती सप्टेंबरच्या मध्यात भारतीय दूतावासाला देण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर जवळपास महिनाभराने ३ ऑक्टोबरला भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना आठही भारतीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. पुढचे काही महिने या नौसैनिकांना आठवड्यातून एकदा कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलण्याची परवानगी देण्यात आली होती.

RBI Rules For Loan Recovery: कर्जवसुलासाठी लोन रिकव्हरी एजन्ट्सच्या ‘दादागिरीला’ चाप; आरबीआयने आणिले ‘हे’ नवे नियम

या आठ भारतीय माजी नौसेना अधिकाऱ्यांवर काय आरोप ठेवण्यात आले, याची माहिती अद्याप सार्वजनिक केली गेलेली नसली तरी त्यांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये एकांतवासात बंदिस्त केल्यामुळे हे प्रकरण सुरक्षेशी संबंधित असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

भारतीय माजी नौसैनिक कोण?

कॅप्टन नवतेजसिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पुरेनेन्दु तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल व खलाशी रागेश अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व भारतीय अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजिस अ‍ॅण्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संरक्षण सेवा पुरविणाऱ्या कंपनीत काम करीत होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या