दिल्ली । Delhi
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज (५ ऑगस्ट २०२५) निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते.
- Advertisement -
त्यांच्यावर दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सत्यपाल मलिक यांच्या निधनाची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. सत्यपाल मलिक यांनी आपल्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्याबद्दल विशेष ओळख मिळवली होती. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.




