Thursday, August 20, 2026
HomeनगरAhilyanagar : माजी महापौर कळमकर कडून आणखी एका तरूणीवर अत्याचार

Ahilyanagar : माजी महापौर कळमकर कडून आणखी एका तरूणीवर अत्याचार

पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

माजी महापौर अभिषेक कळमकर याने नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप शहरातील एका तरूणीने (वय 27) केला आहे. यासंदर्भात पीडित तरूणीने बुधवारी (8 एप्रिल) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कळमकर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कळमकर याने नोकरीचे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील एका तरूणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल आहे. तेव्हापासून तो पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, मे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिची अभिषेक सोबत ओळख झाली होती. प्रचाराच्या निमित्ताने परिसरात ये-जा करत असताना अभिषेकने तिला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत मोबाईल क्रमांक घेतला होता. यानंतर जुलै 2024 च्या अखेरीस अभिषेकने पीडितेला फोन करून नोकरीच्या निमित्ताने भेटण्यास बोलावले. अहिल्यानगर-पाथर्डी रस्त्यावरील बेलेश्वर मंदिराजवळ बोलावून तिला कारमध्ये बसवण्यात आले. पुढे काही वेळाने पाणी पिण्यास दिल्यानंतर पीडितेला भोवळ आल्यासारखे वाटले आणि त्या अवस्थेचा फायदा घेत कारमध्येच तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर काही दिवसांनी अभिषेकने पुन्हा संपर्क साधत भेटण्याचा दबाव टाकला. तसेच, अत्याचाराच्या वेळी काढलेले फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार छळ केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. भीतीमुळे काही काळ पीडितेने आपला मोबाईल बंद ठेवला होता आणि हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. दरम्यान, अभिषेक विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर पीडितेने आपल्या नातेवाईकांना घटना सांगितली. त्यांच्या आधाराने तीने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कर्जमाफीसाठी 4 हजार कोटी; दुसर्‍या टप्प्यात लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 च्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने दुसर्‍या टप्प्यात 4 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली...