Thursday, May 2, 2024
Homeनगरमाजी आ. भानुदास मुरकुटे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर!

माजी आ. भानुदास मुरकुटे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काही महिन्रांपूर्वी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात गेलेले श्रीरामपूरचे माजी आ. भानुदास मुरकुटे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. येत्या 3 व 4 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शिर्डीत कार्यकर्त्यांच्या मेळावा होत आहे. यावेळी श्री. मुरकुटे यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच येथील शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित पार पडला. या मेळाव्यास रा मेळाव्रास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अ‍ॅड. संदीप वर्पे आदी पक्षाचे प्रमुख उपस्थित होते. या मेळाव्यापूर्वी श्री. फाळके व अ‍ॅड. वर्पे यांनी माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या ‘जिद्द’ निवासस्थानी जावून तर आ. प्राजक्त तनपुरे यांनी दूरध्वनीवरून श्री. मुरकुटे यांच्याशी चर्चा करुन ज्येष्ठनेते शरद पवार यांचा पक्षासोबत आपण काम करावे, असा निरोप असल्याचे सांगितले. यावेळी श्री. मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय कळवितो असे सांगितले. मात्र या चर्चेनंतर काही वेळात झालेल्या मेळाव्रास माजी आ. मुरकुटे यांची कट्टर समर्थक भाऊसाहेब मुळे, गणेश भाकरे, गणेश छल्लारे, प्रसाद खरात, आशिष दौंड, बाळासाहेब नाईक आदी उपस्थित होते. मुरकुटे समर्थकांच्रा उपस्थितीने अनेकांच्रा भुवरा उंचावल्रा. राजकीर तर्क वितर्काला सुरुवात झाली. मुरकुटे समर्थकांची उपस्थिती मुरकुटे रांच्रा संमतीनेच असावी, असे मानले जात आहे.

काही महिन्रांपूर्वी माजी आ.मुरकुटे रांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.त्रांचेवर महाराष्ट्र राज्राचे समन्वरक म्हणून जबाबदारी देण्रात आली. पण हा निर्णर काही प्रमुख कार्रकर्त्रांच्रा पचनी पडला नाही. उघडपणे कोणी बोलत नसले तरी कार्रकर्ते रा निर्णराबाबत समाधानी नसल्राचे बोलले जात आहे. त्रात ‘बीआरएस’ चा तेलंगणा रा स्वगृहीच पराभव झाल्राने मुरकुटे समर्थकांत अस्वस्थता असताना मुरकुटे समर्थकांची मेळाव्रास हजेरी लक्षवेधी ठरली. मुरकुटे समर्थकांची शरद पवार गटाच्रा मेळाव्राच्रा उपस्थितीने मुरकुटे रांच्रा भुमिकेपुढे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

माजी आ.मुरकुटे रांनी लोकसेवा विकास आघाडीव्दारे सवतासुभा निर्माण केला. करण ससाणे रांचेशी रुती करुन त्रांनी अशोक साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचारती, सोसारटी निवडणुका जिंकून राजकीर वर्चस्वही प्रस्थापित केले. अशास्थितीत माजी आ. मुरकुटे रांच्रा राजकीर भुमिकेबद्दल कार्रकर्ते आणि जनतेत संम्रम निर्माण झाला आहे. आता ते राजकीर घुमजावच्रा पवित्र्यात आहेत, अशी चर्चा राजकीर पातळीवर होत असून त्यांची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे असल्याचे दिसते.

दरम्यान काही कार्यकर्त्यांचा या प्रवेशास विरोध असून आपले ‘लोकसेवा आघाडी’ चे संघटन कायम ठेवावे व सोयीनुसार राजकीय पक्षास पाठिंबा द्यावा असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. मात्र कार्यकर्त्यांची चर्चा करुनच पुढील राजकारणाची दिशा ठरविण्याच्या मनस्थितीत श्री. मुरकुटे दिसत आहेत. त्यामुळे शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या