Sunday, November 24, 2024
HomeनाशिकNashik Political : माजी आमदार धनराज महाले उद्या उमेदवारी अर्ज भरणार; महायुतीमध्ये...

Nashik Political : माजी आमदार धनराज महाले उद्या उमेदवारी अर्ज भरणार; महायुतीमध्ये बंडखोरी?

नाशिक | Nashik

राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी असून कालपासून (दि.२२) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahayuti and Mahavikas Aaghadi) जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. पंरतु, महायुतीकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून अद्यापही जागावाटप किंवा उमेदवार घोषित झालेले नाही. त्यामुळे सध्या मविआचे इच्छुक उमेदवार वेटिंगवर आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्याने घटक पक्षांतील तिन्ही पक्षांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी उफाळून आली आहे. ही बंडखोरी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात देखील दिसून येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्मचे वाटप

आज महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातून (Dindori-Peth Assembly Constituency) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीमधील दुसरा घटक पक्ष असणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shinde Shivsena) या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेले माजी आमदार धनराज महाले बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. धनराज महाले हे उद्या दिंडोरी येथे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे झिरवाळ यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.

हे देखील वाचा : Shahajibapu Patil : “गुलाल नाय उधळला तर फाशी…”; शहाजीबापू पाटलांचं संजय राऊतांना ओपन चॅलेंज

दरम्यान, यावेळी देशदूतशी बोलतांना माजी आमदार धनराज महाले (Dhanraj Mahale) म्हणाले की, ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत पक्षप्रवेश केला, त्यावेळी मला दिंडोरी विधानसभेतून उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. त्यादृष्टीने मी मतदारसंघात संवाद दौरे करत मतदारांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर भाजप-शिवसेनेच्या (BJP and Shivsena) युती सरकारमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा समावेश झाला आणि आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली. यानंतर राष्ट्रवादीकडून नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, या मतदारसंघातून मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Amit Thackeray : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ”तेव्हा माझ्या पोटात…”

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातून मी उद्या एक अपक्ष आणि एक पक्षाच्या नावाचा असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यात जर पक्षाने उमेदवारी दिली तर पक्षाच्या वतीने लढेल नाहीतर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तसेच गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात कुठल्याही प्रकारची ठोस विकासकामे झाली नसून रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था आहे. त्यामुळे झिरवाळ यांच्याबाबत मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

धनराज महाले, माजी आमदार, दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या