Thursday, March 13, 2025
Homeजळगावमाजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारात महिलांची आघाडी

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारात महिलांची आघाडी

पाचोरा । प्रतिनिधी

पाचोरा भडगाव विधानसभेच्या निवडणुकीत पुरुषांच्या बरोबरीने महिला भगिनींनी देखील प्रचारात उतरल्या आहेत. त्यात माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारात सर्व नातेवाईक व घरातील महिला भगिनींनी देखील ग्रामीण भागासह शहरी भागातील एक एक गल्ली पिंजून काढीत आहेत.

- Advertisement -

खर्‍याअर्थाने घरा घरात व घरातील महिला भगिनींशी आस्थेवाईकपणे चर्चा करून दिलीप भाऊ वाघ यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करीत आहेत. कुठलाच गाजावाजा न करता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न या महिला भगिनी करीत आहेत. पाचोरा भडगाव शहरातील विविध कॉलनीत व गल्ली बोळात फिरुन व ग्रामीण भागात गावोगावी घरोघरी जाऊन प्रचारात या महिला भगिनींनी आघाडी घेतली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...