Tuesday, January 6, 2026
HomeनगरAhilyanagar : माजी आमदाराच्या कुटुंबावर हल्ला; दोन गाड्या फोडल्या

Ahilyanagar : माजी आमदाराच्या कुटुंबावर हल्ला; दोन गाड्या फोडल्या

सात जणांविरोधात गुन्हा

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

शहरातील सिद्धार्थनगर येथील दिवंगत आमदार विठ्ठलराव भैलुमे यांच्या कुटुंबावर गुरुवारी (दि.1) रात्री कोयत्याने हल्ला करण्यात आला. माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलूमे, त्यांचे पती नंदकुमार भैलुमे व मुलगा अजय भैलुमे यांच्यावर मित्राला मदत करतो म्हणून कोयता व लाकडी दांडक्याच्या सहाय्याने हल्ला करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सुदैवाने ते या हल्यातून बचावले मात्र दोन चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. प्रतिभा भैलूमे यांच्या फिर्यादीनूसार याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीनूसार, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे पती नंदकिशोर, मुले प्रणव व अजय यांच्यासह कर्जत येथे राहतात. गुरुवारी रात्री सुमारे 12.30 वाजता, फिर्यादी कुटुंब घरी झोपलेले असताना आरोपींनी घराचा दरवाजा जोरजोराने वाजवत शिवीगाळ सुरू केली. खिडकीतून पाहिले असता दत्ता बबन भैलुमे, अक्षय बबन भैलुमेे, तेजस बबन भैलुमेे, भारती बबन भैलुमे (सर्व रा. सिद्धार्थनगर, कर्जत), कार्तिक निलेश गुंड (गुंडवस्ती, कुळधरण रोड, कर्जत), शुभम सुरेश शिरोळे ( बुवासाहेब नगर कर्जत) आणि यशराज राजकुमार आढाव (रा.बारडगाव सुद्रिक, कर्जत) यांनी लाकडी दांडके व कोयते हातात घेऊन जोरजोरात ओरडत शिवीगाळ करत होते व घराच्या बाहेर या असे धमकावत होते. फिर्यादी व यांचा मुलगा अजय व सर्व कुटुंब बाहेर आले असता त्यांनी तुमच्या मुलाच्या सपोर्टमुळे अनुराग शरद माने हा उड्या मारतो आहे, असे म्हणत फिर्यादीच्या दिशेने कोयता फेकून मारला मात्र त्या खाली वाकल्यामुळे वार चुकला त्यानंतर त्यांनी अजय यास लाकडी दांडक्याने मारहाण केली. तुला कोणी वाचवायला आला तर ठार मारू, अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

YouTube video player

घटनेदरम्यान शेजारी व नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. मात्र, जाताना आरोपींनी पुन्हा येऊन ठार मारण्याची धमकी दिली असून, फिर्यादींच्या घरासमोर उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांचेे कोयत्याने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.याप्रकरणी पुढील तपास कर्जत पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : ‘स्कार्फ’मुळे पडल्या बेड्या! बसस्थानकातून दागिने लंपास करणाऱ्या महिलेस...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik चेहऱ्यावर स्कार्फ, गर्दीत सफाईदार हालचाली आणि दोन मिनिटांत बदललेला वेश ठक्कर बझार बसस्थानकावरील गर्दीतून महिलेचे (Woman) लाखो रुपयांचे दागिने (Jewelry)...