नाशिक | प्रतिनिधी | Nashik
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राज्यातील महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मात्र, महायुती व मविआकडून नाशिकसह इतर ठिकाणच्या लोकसभेच्या जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेले नव्हते. त्यानंतर आता मविआतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली असून त्यात १७ जणांचा समावेश आहे…
यात औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर सांगलीतून चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तसेच रायगडमधून अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली असून परभणीमधून संजय जाधव यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून लोकसभेसाठी इच्छुक असणारे विजय करंजकर यांचा हिरमोड झाला आहे.
दरम्यान, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई वायव्य या मुंबईतील दोन जागांवरही काँग्रेसने दावा केला होता. पण तिथेही अमोल किर्तीकर आणि अनिल देसाई यांची उमेदवारी जाहीर करत या दोन जागा ठाकरे गटाने आपल्याकडे घेतल्या आहेत.