Wednesday, June 19, 2024
Homeनाशिकमनसेचे माजी आमदार नितीन भोसलेंचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मनसेचे माजी आमदार नितीन भोसलेंचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

मनसेचे (MNS) नाशिक पश्चिमचे माजी आमदार नितीन भोसले (Nitin Bhosle) यांनी मनसेनेला सोडचिठ्ठी देत मुंबई (Mumbai) येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यशवंतराव चव्हाण सेटर येथे बोलवलेल्या राज्यातील निवडक पदाधिकाऱ्यांच्या बैठकप्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला.

Nashik News : ठाकरे गटाला धक्का; बबनराव घोलप यांचा शिवसेना उपनेतेपदाचा राजीनामा

यावेळी माजी आमदार भोसले यांनी महाराष्ट्राच्या (Maharashtra) हक्काचे नार-पारचे पाणी पुन्हा गोदावरी-गिरणा खोऱ्यात वळविण्यात यावे, ज्यामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा दुष्काळ निर्मुलनास मदत होईल. यासोबतच नाशिक शहर व जिल्ह्यात आयटी पार्क मिळावे व एक व दोन मोठे ॲटो मोबाईल उद्योग मिळावेत अशा तीन मागण्या शरद पवार यांच्या समोर मांडल्या. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शहराध्यक्ष गजानन शेलार, जिल्हा बॅंक माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले, माजी नगरसेवक गोकुळ पिंगळे उपस्थित होते.

Dindori News : करंजवण, ओझरखेड भरण्याच्या मार्गावर; तीन धरणे भरली, तिसगाव ‘इतके’ टक्के

दरम्यान, सदर बैठकीस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील, फौजिया खान, विद्या चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, युवक अध्यक्ष मेहबुब शेख, आमदार जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, एकनाथ खडसे, खा. अमोल कोल्हे यांच्यासह आदी निवडक पदाधिकारी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Shivsena : “बाजूला पेट्रोल पंप आहे, तेथून पेट्रोल घेऊन जा अन्…”; शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराचा उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर गंभीर आरोप

- Advertisment -

ताज्या बातम्या