सरगाणा । प्रतिनिधी Surgana
दिंडोरी लोकसभेचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले.त्यांचा अंत्यविधी राहत्या गावी प्रतापगड येथे करण्यात आला. सुरगाणा,सुर्यगड, प्रतापगड येथे नागरिकांनी अंतिम दर्शन घेतले. सुरगाणा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, माजी आमदार जे.पी.गावित, माजी आमदार धनराज महाले, डांगचे माजी आमदार मंगळभाई गावित,सोनालिराजे पवार, रत्नशीलराजे पवार, नगराध्यक्ष भरत वाघमारे, रमेश थोरात, धनराज कानडे,यादव धुम,सखाराम भोये,मोहन गांगुर्डे, चिंतामण गावित, गोपाळ धुम, जनार्दन भोये, आदिवासी बचाव अभियानाचे अध्यक्ष अशोक बागुल,राम चौरे,रतन चौधरी, उत्तम वाघमारे,एन.डी.गावित,धनराज कानडे,भावडू चौधरी,सुभाष चौधरी, हरिभाऊ भोये,आजी माजी नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच दिंडोरी मतदार संघातील घाटमाथ्यावरून तसेच तालुक्यातून आलेले भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, माकप, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार,नरहरी झिरवाळ, धनराज महाले, जे. पी.गावित आदींनी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या. यावेळी चव्हाण यांचे शालेय मित्र असलेले राजकीय क्षेत्रातील कट्टर विरोधक मानले जाणारे माजी आमदार जे.पी.गावित यांना बोलतांना भावना अनावर झाल्या होत्या.