दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori
दिंडोरी लोकसभेचे (Dindori Loksabha) माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण ( MP Harishchandra Chavan) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. दोस्तीच्या दुनियेतील, दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून चव्हाण परिचित होते. सर्व पक्षात त्यांचा मित्र परिवार होता. त्यांनी सुरुवातीच्या काळात काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करुन निवडणूक लढवली होती.
त्यानंतर १९९५ मध्ये जिल्हा परिषदेला निवडून आल्यावर समाजकल्याण सभापती (Chairman) म्हणूनही त्यांनी काम पहिले होते. जिल्हा परिषद प्रभारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन लोकसभा लढवली होती. चव्हाण भाजपाकडून मालेगाव लोकसभा मतदारसंघातून (Malegaon Lok Sabha Constituency) दोन वेळा निवडून आले होते. यानंतर दिंडोरी लोकसभा निर्माण झाल्यावर पहिला खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला होता. पक्षाने नंतर तिकीट न दिल्याने ते कार्यकर्ता म्हणूनच काम करत होते.
दरम्यान, चव्हाण यांना दीर्घ आजाराने ग्रासले होते. यानंतर आज त्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी सकाळी ६ वाजता निधन (Passed Away) झाले. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ४ वाजता प्रतापगड वैकुंठधाम ता. सुरगाणा जि. नाशिक ( सुरगाणा शहरापासून अवघे ३ कि. मी. अंतरावर) येथे होणार आहे.